रेल्वेतून पडल्याने श्रीरामपूरमध्ये तरुणाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील एका तरूणाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.५) पहाटे तीन वाजेच्या सुमारास चितळी रेल्वे स्टेशन जवळ घडली.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सागर चंद्रकांत आढाव (वय २१, रा. माळवाडगाव) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहित अशी : या तरूणाचा राहाता तालुक्यातील चितळी रेल्वे स्टेशनच्या पुढे पुणतांबा लाईनवर ४३०/४ कि.मी.च्या दरम्यान सोमवारी (दि. ५) पहाटे तीन वाजता किमॅन रेल्वे ट्रॅकची तपासणी करत असताना त्यांना या तरूणाचा रेल्वेखाली सापडलेला छिन्न-विछिन्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तत्काळ किमॅनने संबंधीत स्टेशन मास्तरला याबाबत कळविले. सकाळी नऊ वाजता रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. त्याप्रसंगी मृतदेहाजवळ एक मोबाईल आढळून आल्याने सदर तरूणाची ओळख पटली. पंचनामा झाल्यानंतर सदर तरूणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास रेल्वे पोलीस सोनवणे, बढे हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.