कर्जतमध्ये सबका साथ, सबका विकास : ना.राम शिंदे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : कर्जत बदलते आहे, सुधारते आहे, सुधारण्याचा हक्क हवा असेल तर प्रत्येकाने थोडा त्याग केला पाहिजे. अरुंद रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांनी स्वत: मागे सरकले पाहिजे.एक प्रश्न सुटला की, दुसरा उभा राहत असतो. मात्र, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करत राहू. कर्जतकरांना उन्हाळ्यापूर्वी फिल्टरयुक्त पाणी प्यायला मिळेल, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. कर्जत नगरपंचायत अंतर्गत हद्दीमध्ये विविध विकासकामाच्या भूमिपूजप्रसंगी ते बोलत होते. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कर्जत नगरपंचायत अंतर्गत नेवसेमळा, म्हसोबागेट, भवानीनगर, भांडेवाडी, गायकरवाडी आदी ठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या वेळी नगराध्यक्ष राऊत म्हणाले, ना. शिंदे यांनी दिलेला निधी सर्व प्रभागांत दिला जातो. शहरात चांगल्या प्रतीची कामे केली जात आहेत. लवकरच शहरवासीयांना फिल्टरयुक्त पाणी मिळेल. या वेळी ना. शिंदे यांनी नगराध्यक्ष राऊत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहरात सबका साथ, सबका विकास, असे काम सुरू असल्याने लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पहावयास मिळत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
कर्जतकरांना उन्हाळ्यापूर्वी फिल्टरयुक्त पाणी प्यायला मिळेल. म्हसोबा गेटवरील कार्यक्रमात नगरसेविका मोनाली तोटे यांनी आपल्या भागाला झोपडपट्टी असे नाव होते. मात्र, हे चित्र तेथील नागरिकांनी बदलले असून, आपला प्रभाग हागणदारीमुक्त झाला आहे. येथील नागरिकांना सिटीसव्र्हे उतारे, मुलांना खेळाचे मैदान, व्यायामशाळा, बाग व पेव्हिंगब्लॉकचे रस्ते मिळावेत, आदी मागण्या केल्या. सूत्रसंचालन बापू उकिरडे यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.