बलात्कारातून मुलगी गरोदर,अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : नेवासा तालुक्यातील एक गावातील अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याने बळजबरीने शरीर संबंध ठेवले. यातून पिडीत मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला डॉक्टराकडे नेले असता तपासणीअंती ती गरोदर असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी गावातील अल्पवयीन मुलाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील गरीब कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी इयत्ता नववीत शिक्षण घेते. तिची आई मोलमजुरी करते, तर वडील अपंग आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी रविवारी शाळेला सुटी असल्याने ती घरी एकटीच होती. आई मजुरीसाठी, तर वडील गुरांना चारा आणण्यासाठी गेले होते. याचा फायदा घेत परिसरातील एका अल्पवयीन मुलाने घरात जबरदस्तीने घुसून दरवाजा बंद केला. मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तोंड दाबून बळजबरीने अत्याचार केला. 

याप्रकरणी पिडीत मुलीने कोणासही काहीही सांगितले नाही. त्यानंतर पुन्हा तीन-चार दिवसानंतर दुपारी पिडीत मुलगी घरी एकटीच असताना त्याने पुन्हा शारीरिक संबंध ठेवले. यावेळीही घाबरल्याने तिने ही बाब घरच्यांपासून लपवून ठेवली. मात्र, काही दिवसांनी तिच्या पोटात दुखू लागल्याने गावातील डॉक्टरकडे तपासणी केली असता शंका आल्याने नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याठिकाणी तपासणीदरम्यान ती गरोदर असल्याचे समोर आले. त्यावरुन पिडीत मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाविरूद्ध गु.र.नं. ५२/२०१८, भा.दं.वि. कलम ३७६ व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कायदा २०१२ चे कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यातून हा गुन्हा नेवासा पोलिसांत वर्ग केला आहे. सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.