हात, पाय तुटलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ परिसरातील मुसळवाडी तलावालगत सतिष सोनवणे यांच्या उसाच्या क्षेत्रात १४ वर्षीय अदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीचा हात, पाय तुटलेल्या व डोक्याची कवटी बाजुला असलेला मृतदेह आढळून आल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास टाकळीमियाँ येथील सतिष शंकर सोनवणे यांच्या उसाच्या शेतात येथीलच एक महिला जनावरांना गवत आणण्यासाठी गेली होती. यावेळी मनिषा रोहिदास वाघ (वय १४) हिचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, सविता सदावर्ते, हवालदार सतिश त्रिभुवन, बंडू बहीर, गुरजी फाटक घटनेच्या ठिकाणी दाखल झाले.

ही मुलगी दोन आठवड्यांपूर्वी टाकळीमियाँच्या आठवडे बाजारातून गायब झाली होती, अशी माहिती मुलीचे वडिल रोहिदास वाघ यांनी सांगितली. तसेच ती शेतात खुरपणीच्या कामास जात होती. मृतदेह मिळालेल्या ठिकाणी मुलीच्या डोक्याची कवटी बाजुला पडली होती, तसेच घोट्यापासून दोन्ही पाय नाहिसे झाले आहेत, तसेच हाताचे पंजेही नाहीत. मृतदेहाच्या जवळ कानातील झुबे काही अंतरावर पोलिसांना मिळून आले आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
घटनेच्या ठिकाणी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, वन विभागाचे अधिकारी आदींना पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या मुलीचा मृतदेह या ठिकाणी कसा आला?, तीला उसात कोणी आणून टाकले का?, तिचे कोणाशी काही वाद झाला होता का?, तिच्यावर बिबट्याने हल्ला केला का?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.