गव्हाणेवाडी गोळीबारप्रकरणी तिघांना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागील महिन्यात तालुक्‍यातील गव्हाणेवाडी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना बेलवंडी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी अटक केली. तीनही आरोपींना शिरूर (जि. पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले. 24 जानेवारी रोजी गव्हाणेवाडी शिवारात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार झाला होता. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत बेलवंडी पोलिसांत दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले होते. मंगळवारी पहाटे बेलवंडी पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी शरद तुकाराम काळे, आकाश एकनाथ काळे, संकेत कल्याण कचरे(तिघे रा. गव्हाणेवाडी) या तिघांना शिरूर(जि. पुणे) येथून अटक केली. 

न्यायालयाने या तीनही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ करीत आहेत. बेलवंडी पोलिसांच्या पथकात पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ, पोलीस उपनिरीक्षक हिवरकर, हवालदार कैलास देशमुख, सुरवसे, पोलीस नाईक आबासाहेब झावरे, मोढळे, लोंढे, क्षीरसागर यांचा समावेश होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.