संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे ! संगमनेरकरांचा एल्गार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे, असा निर्धार करत रविवारी शहरात शासकीय विश्रामगृहामध्ये संगमनेर जिल्हा कृती समितीची पहिली बैठक पार पडली. त्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.काही दिवसांपूर्वी पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर जिल्ह्याचे विभाजन होणार असे सुतोवाच केल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनीदेखील नगर जिल्हा विभाजनाबाबत शासन सकारात्मक आहे. तसेच नगर जिल्हा विभाजनाबाबत प्रस्ताव अहवाल मागविण्यात आले आहे, असे बोलून महसूलमंत्र्यांनी नगर जिल्हा विभाजनावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्या पार्श्‍वभूमीवर संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे या आपल्या न्यायहक्‍क मागणीसाठी शहरात संगमनेर जिल्हा कृती समितीची पहिली पार पडली. काही वर्षांपूर्वीच नगर जिल्हा विभाजनाचा प्रश्‍न चर्चिला गेला होता. तेव्हाच संगमनेर जिल्हा कृती समिती जोरदार तयारीला लागली होती. परंतु तेव्हा तूर्तास सरकारकडून जिल्हा विभाजनाचा कुठलाही विचार नसल्याने संगमनेर कृती समितीची चळवळ थोडी थंडावली होती.

पंरतु आता सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या निर्णयाबाबत शासन पातळीवर हलचालींना वेग आल्याने सर्व संगमनेरकर तसेच संगमनेरकर कृती समितीचे सर्व सदस्य मन-तन-धनाने एकत्र झाले आहे. संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे अशी प्रत्येक संगमनेरकरांची इच्छा आहे. संगमनेर जिल्हा व्हावा यासाठी मोठे जनआंदोलन उभे करण्याचा सर्वपक्षीय एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
संगमनेर तालुका तसेच शहर जिल्हा होण्याच्या दृष्टीने कसे योग्य आहे. तसेच त्या संदर्भात लागणारे सर्व कागदपत्रे व त्या संदर्भातील नवीन अहवाल तयार करण्याच्या कामाला कृती समितीने सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे करणे, शासनाला निवेदन देणे, या आंदोलनात स्वाक्षरी मोहीम राबवणे, पुन्हा एकदा नव्याने जिल्हा कृती समितीची स्थापना करणे या विषयांवर चर्चा करून पुढील रणनीती आखण्यात आली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या आंदोलनात अकोले करांना ही समाविष्ट करून घेऊन हे आंदोलन उभे करणार असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत आलेल्या प्रत्येकाने आपआपल्या सूचना यावेळी मांडल्या. पक्ष भेद विसरून एक संगमनेरकर म्हणून प्रत्येकाने योगदान द्यावे. संगमनेर व अकोलेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही आपले भरीव योगदान द्यावे हा संगमनेरच्या अस्मितेचा प्रश्‍न आहे. त्यांनी शासन दरबारी एक आपला दबाब निर्माण करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

यावेळी जिल्हा कृती समितीचे भाजपचे राजेश चौधरी, राम जाजू, दीपक भगत, राजेंद्र सांगळे, काशिनाथ पावसे, सीताराम मोहरीकर, गजेंद्र नाकील, कॉंग्रेसचे विश्‍वास मुर्तडक, अमोल खताळ, राष्ट्रवादीचे प्रशांत वामन, शौकत जहागीदार, कपिल पवार, शरद थोरात, वकील संग्राम गुंजाळ, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, पप्पू कानकाटे, अमित चव्हाण, नरेंद्र माळवे, मनीष माळवे, सचिन पलोड, प्रा. दसरे, अशोक सातपुते, शरीफ भाई आदींसह जिल्हा कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.