महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालया समोर निंबळक ग्रामस्थांचा आक्रोश

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एमआयडीसी कंपनीतील घातक रासायनिक पदार्थांच्या विल्हेवाटसाठी कचरा डेपो उभारावा व रसायनयुक्त पाणी जलस्त्रोतामध्ये न सोडता त्याची योग्य व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी निंबळक ग्रामस्थांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालया समोर संबळ वाजवून आक्रोश केला. तसेच एमआयडीसी येथील गॅस कंपनी ते निंबळक दरम्यान दोन्ही बाजूने पथदिवे बसवावे, रस्त्यावर चौका-चौकात गतीरोधक उभारण्याची मागणी करीत धरणे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांची दखल न घेतल्यास अधिकार्‍यांना खुर्च्यावर बसू न देता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------   
गावातील तलावात दरवर्षी मत्स्योत्पादन केले जाते. मात्र या वर्षी कंपनीतील रसायनयुक्त पाणी पावसाळ्यात इतर जलस्त्रोताद्वारे तलावात आल्याने एकही मासा जीवंत राहिला नाही. यामुळे ग्रामपंचायतचे सुमारे चार लाखाचे नुकसान झाले आहे. तर घनकचरा व्यवस्थापनासाठी एमआयडीसीतील राखीव असलेल्या भुखंडाचे प्लॉट अधिकार्‍यांनी संगनमताने विकल्याचा आरोप माजी सरपंच विलास लामखडे यांनी केला. मारुती गारुडकर या शेतकर्‍यांनी आपल्या विहीरीला रसानयुक्त पाणी आल्याने ते शेतीला गेल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगितले. 

एमआयडीसीत पुरेश्या प्रमाणात पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्री कामगारांना लुटण्याचे प्रकार घडत आहे. तर या रस्त्यांवर गतीरोधक नसल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. एमआयडीसीला लागून मोठी नागरी वस्ती असून, कंपनीत घातक रासायनिक पदार्थ जाळण्यात येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर या पदार्थांच्या विल्हेवाटाची व्यवस्था नसल्याने ते बाहेर उघड्यावर टाकले जात आहे. तरी एमआयडीसीने नागापूर वसाहतमध्ये एक भूखंड विकसीत करुन येथे या रासायनिक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी. तर एमआयडीसीतून निघणारे रासायनिकयुक्त सांडपाणी तलावात सोडले जात आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याचा दुष्परिणाम परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्यावर होवून, या भागातील शेतकर्‍यांचे अनेक जनावरे अनेक गंभीर आजार होवून दगावली आहेत. यासाठी तातडीने गॅस कंपनी ते निंबळक दरम्यान दोन्ही बाजूने पथदिवे बसवावे, रस्त्यावर चौका-चौकात गतीरोधक उभारावे व रसायनयुक्त पाणी जलस्त्रोतामध्ये न सोडता त्याची योग्य व्यवस्था करण्याची मागणी निंबळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनात माजी सरपंच विलास लामखडे, ग्रा.पं. सदस्य विलास होळकर, मारुती गारुडकर, अशोक शिंदे, बाबासाहेब पगारे, जगन्नाथ शिंदे, मुख्तार खान, काशीनाथ ढेरे, दिपक संसारे, सतीश ढगे, लक्ष्मण होळकर, सुभाष कोरडे, दत्ता भुमकर, सतीश शेलार, किसन शिंदे आदिंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.