समाजाचा वापर करून लाल दिव्याची मजा भोगणाऱ्याला घरी बसवले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दलित स्वयंसेवक संघ व बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून समाजाचे संघटन करून राजकारणासाठी वापर केला. समाजाच्या जीवावर लाल दिव्याची मज्जा भोगणाऱ्याला अखेर समाजानेच घरी बसवले, अशी टीका माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे नाव न बहुजन लोक अभियानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आबासाहेब वाघमारे यांनी केली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
बहुजन लोक अभियानच्या रविवारी झालेल्या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष एन. एस. खंदारे, महासचिव वसंतराव सकट, संजय कदम, वसंतराव लोखंडे, लक्ष्मण म्हस्के उपस्थित होते. वाघमारे म्हणाले, माझ्यामागे संपूर्ण समाज आहे, असे भासवून स्वत:चा फायदा करून घेतला, समाजाकडे ढुंकूनही पाहिले नाही. ढोबळे यांनी बहुजन रयत परिषद बंद करा असे सांगितले. त्यांना आम्ही नाही, तर त्यांनीच आम्हाला सोडले. म्हणून आम्ही बहुजन लोक अभियानाची स्थापना केली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.