वाळूतस्करांकडून तलाठ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा तालुक्यातील तामसवाडी शिवारात महसुलचे कर्मचारी शनिवारी रात्री गस्त घालत असताना वाळूतस्करांनी सरकारी वाहनाला धक्का मारून कामगार तलाठ्याला जखमी केले व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. नेवासा पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील कामगार तलाठी दिलिप श्रीधर जायभाय व सहकारी शनिवारी (दि. ३) रात्री तामसवाडी शिवारात गोडी नदीपात्रात गस्त घालत असताना वाळुने भरलेल्या दोन ट्रॅक्टरने सरकारी गाडीला रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास धक्का मारून नुकसान करून त्यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व तलाठी जायभाय यांना उजव्या पायावर रॉडने मारहाण केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शिवीगाळ करून दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला व वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याची तक्रार तलाठी जायभाय यांनी गणेश अशोक भोगे, राजू गोपीनाथ मराठे, दिपक पालवे, लाटे, फाटके आदिंविरूद्ध दिली आहे. यावरून नेवासा पोलिसांनी भादंवि कलम ३०७, ३५३, ३७९ तसेच गौण खनिज कलम ३/१५अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल सुर्यवंशी पुढील तपास करित आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.