अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास शिर्डी जिल्हा करण्याची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजनाचे सुतोवाच केल्यानंतर उत्तर नगरचा म्हणून शिर्डी जिल्हा व्हावा या मागणीसाठी शिर्डीतील प्रमुख नेत्यांची व ग्रामस्थांची बैठक होवून त्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याची माहीती डॉ. एकनाथ गोंदकर यांनी दिली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शनिवारी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील नगर बायपासच्या उद्घाटनप्रसंगी आले असता नगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार आहे असे स्पष्ट केले. त्यांनतर आता शिर्डी शहरातील प्रमुख नेतेमंडळी लवकरच बैठक घेणार असून या बैठकीत उत्तर नगरसाठी शिर्डी हा जिल्हा करण्यात यावा, अशी शासन दरबारी मागणी करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा घोषित आहे. त्याच नावाने उत्तर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे दुसरा जिल्हा होणे संयुक्तीक वाटणारे नाही. त्याचबरोबर शिर्डी शहर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे या शहराला जोडणारे दळणवळणाची साधने उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे शिर्डी शहराच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कृषी महामंडळाच्या जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे शिर्डी जिल्हा झाल्यास जिल्ह्याचे केंद्रस्थान होवू शकते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्याचबरोबर साईबाबा संस्थानकडे आजमितीस मोठ्या प्रमाणात इमारती शिल्लक आहेत. त्यामुळे शासनाला तूर्तास प्रशासकीस कार्यालय होण्यास मोठी उपलब्धी होवू शकणार आहे. यासाठी साईबाबा संस्थानही मोठ्या प्रमाणात शासनाला सर्वंकष मदत करू शकणार आहे. 

त्याचबरोबर उत्तर नगर भागाचा पूर्व-पश्चिम क्षेत्रफळदृष्ट्या विचार केल्यास अकोले व नेवासा तालुक्यास हे केंद्र उपयुक्त ठरू शकणार आहे. या बाबींचा विचार लवकरच ग्रामस्थ बैठक घेणार असून या शिर्डी ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेणार आहे, अशी माहिती साई संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी दिली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.