श्रीगोंद्यातील सोनारास लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून मध्य प्रदेश व गुजरातमधून जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील सोन्या-चांदीचे व्यापारी पंकज डहाळे यांना मंगळवारी (३० जानेवारी) रात्री आठच्या सुमारास ते दुकान बंद करून शिरूरला जात असताना देवदैठण-शिरूर रस्त्यावरील पेट्रोलपंपाच्या पुढे राजापूर फाट्यानजीक चार चोरट्यांनी डोळयात मिरचीची पूड टाकून डहाळे यांच्याकडील तब्बल ११ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मागर्दर्शनाखाली पथके तयार करून स.पो.निरीक्षक कैलास देशमुख व स.पो.निरीक्षक शरद गोरडे, पो.स.ई राजकुमार हिंगोले, पो.स.ई सुधीर पाटील, पो.स.ई श्रीधर गुट्टे,पो.हे.कॉ. भाऊसाहेब काळे,पो.हे.कॉ.उमेश खेडकर,पो.ना.मल्लिकार्जुन बनकर,पो.हे.कॉ दत्ता हिंगडे,पो.ना रवींद्र कर्डिले,पो.ना गव्हाणे आणि सातपुते,शिंदे,सोनटक्के,विजय ठोंबरे,पो.ना संदीप,विजय कुमार वेठेकर,दिगंबर कारखिले,पो.ना मनोज गोसावी,राहुल हुसळे,पो.कॉ सचिन अडबल,पो.हे.कॉ मन्सूर सय्यद,चालक संभाजी कोतकर,बबन बेरड,सचिन मिरपगार,सचिन कोळेकर, पोलिस कॉ.स्मिता भागवत,वाघमारे ही टीम या आरोपींच्या शोधात मध्यप्रदेश येथे गेली होती.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत सुरत येथे जावून शोध घेतला असता आरोपी तेथून ही फरार झाले त्यानंतर अंकलेश्वर येथे जावून दोन गुन्हेगारांना ताब्यात घेतले त्यानंतर आणखी एकास मुंबईतून ताब्यात घेतले,त्यांचे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्यांची नावे किरण गोवर्धन निकम,वय २१ रा- घोसपुरी,ता - नगर, अविनाश बाळासाहेब आरवे वय - २२,रा- सदर,अक्षय त्रिंबक घोडके,वय - 20 रा सदर, त्यांची चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या साथीदारांचीही नावे सांगितली.

बाळसाहेब पांडुरंग घोडके, रा घोडकेवाडी,घोसपुरी,ता - नगर, सोनू कारले, रा-रा घोडकेवाडी,घोसपुरी,ता - नगर,खवनडल्या (पूर्ण नाव माहित नाही) चम्प्या गांगुर्डे,रा - देहरे,दत्ता घोडके रा घोडकेवाडी,घोसपुरी,ता - नगर.
असे पाच आरोपी अद्याप फरार असून,पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.