छिंदम यांना सातपुतेंवर बोलण्याचा अधिकार नाही !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर होऊन महापौर निवडणुकीत भाजपच्या विरोधात भूमिका घेत राष्ट्रवादीचा महापौर कोणामुळे झाला, असा सवाल उपस्थित करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही उपमहापौर श्रीपाद छिंदम व मनीष साठे यांना शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या विरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा उपरोधिक टोला शिवसेना उपशहर प्रमुख अरुण झेंडे यांनी लगावला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पथदिवे घोटाळ्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल झाले. सातपुते व अन्य नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. छिंदम व साठे या दोघांच्या पडद्याआडच्या नेत्याला यातून अडचणी तयार झाल्या. बुऱ्हाणनगर येथील पाहुण्याच्या इशाऱ्यावर कायम नाचणाऱ्या छिंदम व साठे यांच्या भूमिका तासातासाला कशा बदलतात हे आम्ही सांगण्याची गरज नाही. 

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सातपुते काहीच बोलले नसताना या दोघांनी मुख्यमंत्र्यांवर त्याचे किती प्रेम आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांचे मुख्यमंत्र्यांवरील बेगडी प्रेम मागील महापौर निवडणुकीतच शहरातील जनतेने आणि नगरकरांनी पाहिले आहे, असेही अरूण झेंडे यांनी म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.