नगर-मनमाड राज्यमार्गावर ट्रकची धडक बसून महिला ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : मालट्रकची धडक बसून दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. हा अपघात रविवारी सकाळी साडेसात वाजता नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी फॅक्टरी येथे झाला. छाया लक्ष्मण मुसमाडे (४५ वर्षे) असे महिलेचे नाव असून तिचा पती लक्ष्मण जखमी झाला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
हे जोडपे देवदर्शनासाठी चालले होते. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपानजीक कोल्हारहून राहुरीकडे जाणाऱ्या मालट्रकची (एमएच १७ टी ९५३७) दुचाकीला (एम एच १७ एल ४७२) जोराची धडक बसून छाया जागीच ठार झाल्या. राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ताभेरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.