आ.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमीत्त अभिष्टचिंतन सोहळ्यााचे आयोजन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते मा. महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमीत्त बुधवार दि. 7 फेबु्वारी 2018 रोजी धांदरफळ बु. येथे सकाळी 9.30 वाजता विधान परिषदेचे उपसभापती नामदार माणिकराव ठाकरे यांच्या शुभहस्ते व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यााचे आयोजन करण्यात आले आहे.  

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राज्यातील अभ्यासू, स्वच्छ प्रतिमा, दुरदृष्टी असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्रीमंडळात महसूल, कृषी, शिक्षण, जलसंधारण, पाटबंधारे, रोहयो, राजशिष्टाचार, खार जमीन अशा महत्वपुर्ण खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली, उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण करुन कालव्यांची कामे मार्गी लावली. सहकार, शिक्षण, कृषी, जलसिंचन, दुग्धविकास, मजबुत ग्रामीण अर्थव्यवस्था, वैभवशाली शासकीय इमारतींची निर्मीती, रस्ते, जलसंधारण, संगमनेर बायपास, प्रवरा नदीवर सहा पुल निर्मिती यासह सततच्या विकास कामांतून संगमनेर तालुका राज्यात विकासात अग्रगण्य ठरविला. 

राज्याच्या सक्षम नेतृत्वाबरोबर गुजरातच्या विधान सभा निवड समितीचे अध्यक्षपद भुषवून गुजरातमध्ये काँग्रेसच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. नुकत्याच हिमाचल प्रदेशच्या निरीक्षक पदी ही त्यांची निवड झाली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अशा या लोकप्रिय नेत्याचा धांदरफळ बु. येथे स्व. मुरलीधर बापूजी वलवे लोकमान्य विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. भगीरथजी शिंदे व मालपाणी उद्योग समुहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे याप्रसंगी धांदरफळ बु. गावासाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल श्रीमती यमुनाबाई मुरलीधर वलवे यांचा जाहीर सत्कार रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष अरुण कडू पाटील व संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प. डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या हस्ते होणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिक बंधू- भगिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे असे आवाहन जि.प. सदस्य रामहरी कातोरे, उद्योजक बाळासाहेब देशमाने,भाऊसाहेब डेरे व संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.