निळवंडेचे थेंबभरही पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ देणार नाही !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : गेल्या ४८ वर्षापासून निळवंडे धरणाच्या पाण्याची अतुरतेने वाट पहात असलेल्या निळवंडेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे षड्यंत्र आखले जात असल्याचे शिर्डी ते कोपरगाव प्रस्तावित पाईपलाईनच्या माध्यमातुन पुढे येत आहे. त्याविरोधात तीव्र संघर्ष व लढा उभारण्याचा इशारा निळवंडे पाटपाणी कृती समितीने दिला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कृती समितीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, जुलै २००८ पासुन निळवंडे धरणात पाणी अडविले जात असताना लाभक्षेत्राला पाणी मिळत नसल्याचे दु:ख शेतकऱ्यांना आहे. केंद्रिय जलआयोगाच्या सिंचन नियोजनप्रमाणे ६८८८७ हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन आहे. पाणी कमी आणि सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे प्रवाही, उपसा व सुक्ष्म सिंचनाच्या सर्व पध्दतींचा वापर करुन सामाजिक न्यायासाठी जास्तीत जास्त क्षेत्राला संरक्षण देवुन पाण्याची विषमता घालविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

त्यामुळे शेती व्यतीरिक्त पाणी वळविले गेले तर मुळ नियोजनानुसार संरक्षित केलेल्या शेतीला पाणी देता येणार नाही व ज्या उद्देशाने धरणावर खर्च करुन निर्मीती केली त्या उद्देशाला हरताळ फासला जाईल. दक्षिण भारताची गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरीच्या मुख्य खोऱ्यात असणाऱ्या कोपरगाव शहराला टंचाई भासणे हा प्रकार हास्यास्पद आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यामुळे साई संस्थानने निळवंड्यासाठी पैसे द्यायचे असतील तर विनाअट द्यावेत व लोकप्रतिनिधींनी या पाईपलाईमुळे कोणते क्षेत्र पाण्यावाचुन वंचित राहणार आहे, ते आधी जाहिर करावे आणि जर दुष्काळी भागातील जनतेला आंधारात ठेवुन फसवणुक करणार असतील तर कृती समिती संघर्ष तिव्र उभारेल, असा इशारा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, नानासाहेब शेळके, सचिव, उत्तम घोरपडे, राजेंद्र सोनवणे, दत्ता भालेराव, भाऊसाहेब शिंदे व दादासाहेब पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.