जिल्हा विभाजनावरुन राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यात शीतयुद्ध !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : अहमदनगर जिल्हा विभाजनावरुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्यात सध्या चांगलेच शीतयुद्ध रंगल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम शिंदे हे अपरीपक्व मंत्री असल्याची टीका केली होती. त्यावर पालकमंत्री शिंदे यांनी आज प्रत्युत्तर दिले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित आहे. गेली अनेक वर्षे जिल्ह्यात ३ मंत्री असूनही जिल्ह्याचे विभाजन झाले नाही. जिल्हा मुख्यालयाचा वाद चिघळत ठेवण्यात आला. मात्र मी जरी पहिल्यांदा मंत्री झालो, तरी जे बोललो ते केले आहे. 

नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आयोजीत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी याविषयी बोलताना पालकमंत्री राम शिंदे यांनी विखे पाटलांवर मिश्किल टोलेबाजी केली. मी पहिल्यांदाच मंत्री झालो आहे. तर विखे पाटील हे पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांनी पुन्हा तेच पद भूषवावे, असे ते म्हणाले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
निवडणुकीपूर्वी नगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची घोषणा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मागील आठवड्यात कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे केली. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्याने जिल्हा विभाजनाच्या सुमारे २५-३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयाची नव्याने चर्चा सुरू झाली होती. 

यावर बोलाताना नगर जिल्ह्याचे विभाजन करण्याची पालकमंत्री राम शिंदे यांनी केलेली घोषणा भूलथापा करणारी व उतावळेपणाची आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिंदे यांच्या जिल्हा विभाजनाच्या घोषणेची खिल्ली उडविली होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.