दीड लाखाची रोकड मोटारसायकलीच्या डिकीतून लंपास

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आयसीसीआय बँकेतून काढलेली दीड लाखाची रोकड मोटारसायकलीच्या डिकीतून चोराने लांबवली. ही घटना शनिवारी दुपारी वर्दळीच्या संगमनेर तालुक्यातील नवीन नगर रस्त्याजवळ घडली. चोर जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली. तालुक्यातील देवकौठे येथील बाबासाहेब मुंगसे यांची ही रोकड होती. शनिवारी आठवडे बाजार असल्याने तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी संगमनेरात असते. याचाच फायदा चोरटे घेतात. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.