प्रस्तावित जिल्हा विभाजनात नेवासा दक्षिणेलाच जोडण्याची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्याचे विभाजन करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. त्यामध्ये नेवासा नगर दक्षिण जिल्ह्यालाच जोडण्यात यावा, अशा मागणीसाठी नेवासा तालुका संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू झाली असल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नेवासा तालुक्‍याचा सर्व संपर्क हा नगर शहराशी निगडीत आहे. प्रस्तावित जिल्हा विभाजनात तालुका उत्तरेला जोडला गेल्यास जनतेची गैरसोय होणार आहे. तसे पाहता नेवासा तालुक्‍याची भौगोलिक रचना ही नगर-औरंगाबाद या महामार्गाशी निगडीत आहे. तालुका उत्तरेला जोडला गेल्यास पूर्वेकडील गावे उदा. खामगाव, माका, राजेगाव, चीलेखनवाडी, पांढरी पूल आदी गावांसाठी उत्तरेतील जिल्हा मुख्यालयाचे अंतर खूप दूर होणार आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
प्रशासकीयदृष्ट्या नेवासा नगरला जोडणे आवश्‍यक आहे. नेवासा तालुक्‍यातील जगप्रसिद्ध धार्मिक क्षेत्राची ओळखही नगर जिल्ह्यावरूनच होते. त्यामुळे नेवासा हा नगरलाच जोडावा, अशी मागणी करण्यात आली. यासाठी तालुक्‍यातील सर्व गावामध्ये जाऊन तेथील ग्रामपंचायतींना याबाबतचा ठराव करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

तालुक्‍यातील कांगोनी फाटा येथे यासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिह घुले, श्री संत सावतामाळी युवक संघाचे अध्यक्ष कैलास शिंदे, शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, भीमशक्‍तीचे तालुकाध्यक्ष पप्पू कांबळे, त्रिवेणीश्‍वर कुस्ती केंद्राच्या संचालिका सुनीता गायकवाड, आदी संघटना, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर हजर होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.