अल्पवयीन मुलीवर काकाकडूनच लैंगिक अत्याचार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर काकानेच (वडिलांचा मावस भाऊ) लैंगिक अत्याचार करण्याची घटना जामखेड शहरात घडली. याप्रकरणी सायंकाळी जामखेड पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.20 जानेवारीला पिडीत मुलीचा काका तिच्या घरी आला होता. मुलीस लेन्हेवाडी येथे घेऊन जायचे आहे, असे म्हणाला. घरच्यांनी तिला लेन्हेवाडी येथे घेऊन जाण्यास परवानी दिली. त्यानंतर त्याने त्या मुलीला लेन्हेवाडीला न घेऊन जाता मोटारसायकलवर दुपारी 12:30 वाजता सौताडा येथील वनविभागाच्या उद्यान परिसरात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेल, अशी दमदाटी केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने 30 जानेवारी रोजी पीडित मुलगी रस्त्याने घरी चालली असताना तिला अडविले. तो पिडीत मुलीला म्हणाला, तुझी काकी आजारी आहे, तीला दवाखान्यात घेऊन जायचे आहे. तू तीच्यासोबत दवाखान्यात चल असे म्हणून तिला मोटारसायकलवर बसवून आरोपीच्या घरी नेले. तेथे त्याने पुन्हा मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पिडीत मुलगी आज (दि.3) घरात रडत बसली होती. त्यावेळी तिच्या आईने तीला काय घडले असे विचारले. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पगार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.