विकासनिधी मिळवण्यातही आमदार राजळे आघाडीवर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीन विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे चौदा कोटींचा निधी मिळवून. जिल्ह्यात सर्वाधीक निधी मिळण्याचा मान मिळविला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मोनिका राजळे यांना आमदार होण्याची संधी पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मिळवून दिली. लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची त्यांची पहिलीच वेळ आहे. परंतु विकासकामांचा पाठपुरावा कसा करावा. याचे बाळकडू त्यांना मिळाले ते माहेर आणि सासरच्या मंडळीकडूनच. दिवंगत लोकनेते राजीव राजळे पाथर्डी तालुक्याचे आमदार म्हणून काम करत असतांना, त्यांनी मतदारसंघात भरीव कामे केली. राजाभाऊंची विकासकामे मार्गी लावण्याची व कागदपत्रांचा पाठपुरावा करण्याची पध्दत मोनिकाताईंनी जवळून अनुभवली होती. त्याचाच अप्रत्यक्ष फायदा मोनिकाताईंना आज मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी होत आहे.

एक महिला त्यातच आमदार म्हणून मतदारसंघात काम करण्याची पहिलीच वेळ. तरी देखील आमदार मोनिकाताईंनी विकासनिधी मिळवण्यासाठी जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना मागे टाकल्याचेच, या मंजूर झालेल्या विकास निधींच्या आकडेवारीवरून दिसत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींना चार ते पाच कोटींचा निधी मिळाला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तर पाथर्डीसाठी तब्बल चौदा कोटींचा निधी मिळाला आहे. जलयुक्त अभियान योजनेच्या माध्यमातून देखील गेली दोन वर्षे आ.राजळेंनी जिल्ह्यात सर्वाधिक निधी मिळवण्यात यश मिळविले आहे. पाथर्डी शेवगावसाठी भरीव निधी देण्यामागे राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांचे मोठे योगदान आहे. तसेच पालकमंत्री ना.राम शिंदे यांच्याकडूनही आ राजळेंना मिळणारे झुकते माप आणि आ.मोनिकाताईं कडून विकासकामांचा सातत्याने केला जाणारा पाठपुरावा. महत्वाचा आणि विचार करायला लावणारा ठरत आहे .

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.