ट्रॅक्टरला धडकल्याने तरुणाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बेलापूर - नरसाळी रस्त्यावर ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल (दि. १) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत अधिक माहिती अशी रवींद्र चांगदेव बेल्हे (वय ३०, रा. नरसाळी) हा तरुण मोटारसायकल वरून घरी जात असताना नरसाळी जवळ समोर असलेला ट्रॅक्टर न दिसल्याने त्यावर जावून धडकला. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत त्याला येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी मृत घोषित केले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोेंद करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातापूर्वीही श्री. राजुळेही अशाप्रकारे ट्रॅक्टरला धडकले होते. मात्र, त्यांना किरकोळ दुखापत झाली. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्याने समोरील वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक अपघात घडतात.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.