हक्काच्या पाण्यासाठी खंबीरपणे भूमिका घेण्याची वेळ : ना.विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हक्काच्या पाण्यासाठी खंबीरपणे भूमिका घेण्याची वेळ आली असतानाही मराठवाडा वॉटर ग्रीड पाईपलाईन योजनेबाबत जिल्ह्यातील एकही नेता बोलायला तयार नाही. सर्वांशी गोड राहून कसे चालेल? असा सवाल उपस्थित करतानाच पाणीप्रश्नावरून प्रादेशिक वादाबरोबरच असंतोष निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पक्षीय मतभेद आणि श्रेयवादाच्या लढाया दूर करून एकत्रित येण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिबलापूर येथे सुमारे ८९ लाख रुपयांच्या रस्ते विकास कामांचे भूमीपूजन व अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन ना. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तबाजी मुंतोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी निघुते, पंचायत समिती सदस्य निवृती सांगळे, ॲड. पोपट वाणी, भगवान इलग, सरपंच सिमा मुन्तोडे, उपसरपंच जेहूर शेख, शिवाजी डोंगरे, प्रकाश शिंदे, भागवत उंबरकर, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, कृषी अधिकारी सुरेश नवले, गटविकास अधिकारी शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ना. विखे पाटील म्हणाले, की निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी ५०० कोटी रुपयांपैकी १२५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे मुख्यमंर्त्यांनी मान्य केले आहे. पाण्यासाठी कितीतरी पिढ्यांचा संघर्ष झाला. आता आपण निर्णायक वळणावर आलो आहोत. राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊन कालव्यांची काम मार्गी लावावी लागतील. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, तर ते सोडवावे लागतील. जिरायती भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन करतानाच आता निळवंडेसाठी शेतकरी परिषदेची आवश्यकता नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.