अहमदनगर बाह्यवळण रस्ता दुरुस्ती कामाचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बाहेरील जिल्ह्यातून शहराकडे येणाऱ्या तसेच जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या वाहतुकीसाठी सर्वाधीक महत्वाच्या असलेल्या अहमदनगर शहर बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ आज राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. या रस्ता दुरुस्तीमुळे वाहतुकीची कोंडी होणार नसल्याने हे काम तात्काळ करण्याच्या सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अभय महाजन, राज्य होमिओपॅथिक कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, प्रा. भानुदास गरड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. भोसले, कार्यकारी अभियंता श्री. विभुते, उपविभागीय अधिकारी उज्जवला गाडेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

अहमदनगर शहरातील अवजड वाहतूक शहराबाहेरुन जाण्यासाठी उपयुक्त असणारा हा बाह्यवळण रस्ता खराब झाल्याने दुरुस्तीची मागणी होत होती. त्यामुळे या मागणीची दखल घेत या दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला.दरम्यान, सकाळी महसूलमंत्री श्री. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद रस्त्यालगत असणाऱ्या पर्यावरणपूरक मुख्य विभागीय इमारत परिसरास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हरित इमारत संकल्पनेवर आधारित या इमारतीची रचना, बैठक व्यवस्था, प्रकाश व्यवस्थांबाबत संबंधितांचे कौतुक केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.