अहमदनगर जिल्हापरिषदेत आता मोफत वायफाय सुविधा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत मोफत वायफाय सुविधा कार्यान्वित करण्यास येणार आहे.यासाठी जिल्हा परिषद कुठलाही खर्च करणार नाही. यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व विभागांना व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना यापुढे मोफत वायफाय सुविधेचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे यांनी दिली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्या जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत बोलत होत्या. यावेळी तेलंगणा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प पाहण्यासाठी पाणी पुरवठा व लघू पाटबंधारे विभागातर्फे फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात स्थायी समिती, जलव्यस्थापन व स्वच्छता समितीच्या सदस्यांचा अभ्यास दौरा जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या आवारात एटीएम सुरू करण्यात येणार आहे. त्याचे वीजबिल संबंधीत बॅंकेने द्यावे.तसेच एटीएमच्या सुरक्षेसाठी संबंधीत बॅंकेने वॉचमनची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी नंतर ते दर महिन्याच्या एक तारखेस देण्याबाबत संबंधितांना सुचना दिल्या. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे वेतनही वेळेत देण्याबाबत महिला व बालकल्याण विभागाला सूचना दिल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.