डोक्‍यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या



अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा शहरातील कडूगल्ली मध्येराहणारा संकेत पांडुरंग घोरतळे (वय 22) याने मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गावठी कट्ट्यातून डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या केली. संकेत घोरतळे याने मंगळवारी रात्री गावठी कट्ट्यातून डोक्‍यात गोळी झाडून घेतली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
हा आवाज ऐकून त्याचे कुटुंबिय जागे झाले. त्यांनी त्याला त्वरित नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु रक्‍तस्राव जास्त झाल्याने संकेतचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
संकेत रात्री रामनवमी नियोजनानिमित्त झालेल्या बैठकीला हजर होता. त्याने अचानक आत्महत्या का केली याचे करण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस निरीक्षक लोखंडे, साहाय्यक पो लीस निरीक्षक भिंगारे, सूर्यवंशी यांनी पाहणी करुन एक गावठी कट्टा व गोळीची पुंगळी जप्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.