शेवटच्या श्‍वासापर्यत जनतेची सेवा - शालिनीताई विखे पाटील.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : शेवटच्या श्‍वासापर्यत जनतेची सेवा करू असा शब्द हजारो माता भगिनी, बंधु, युवक आणि युवती यांच्या समक्ष देत आहे, असे ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी येथे दिली.कर्जत येथे जनसेवा फौडेंशन, पंचायत समिती कर्जत व महिला विकास महामंडळ, कर्जत तालुका कृषि विभाग यांच्या वतीने तीन दिवस लेक वाचवा आभियानंतर्गत सक्षम महिला कर्जत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संत गोदड महाराज क्रीडा नगरीच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. यांचे संयोजक डॉ. सुजय विखे यांनी केले. या महोत्सवाचा समारोप अध्यक्षा विखे यांच्या उपस्थितीत सोमवारी झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी डॉ. सुजय विखे, सुनंदा पिसाळ, योगिता सोनमाळी, नगरसेविका पुजा मेहत्रे, मोनाली तोटे, हस्यकवी मिर्जा बेग, अंबादास पिसाळ, प्रविण घुले, दादासाहेब सोनमाळी, कैलास शेवाळे, सचिन घुले, श्रीहर्ष शेवाळे, डॉ. संदीप काळदाते, राजकुमार आंधळकर, बापुराव गायकवाड, रामचंद्र गांगर्डे आदी उपस्थित होते.

अध्यक्षा विखे पाटील म्हणाल्या, पद्‌मश्री विखे पाटील यांनी विखे परिवार हा गोरगरीब, शेतकरी, शेतमजुर, महिला, युवक, युवती यांच्यासह सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माच्या नागरीकांची सेवा करणे, त्यांचे प्रश्न व अडचणी सोडवण्याचा वारसा घालून दिला आहे. हाच वारसा डॉ.सुजय विखे हे पुढे चालवीत आहेत. साई ज्योती महिला बचत गट ही महिलांची सक्षमी करणाची चळवळ उभा केली. 

आज जिल्ह्यामध्ये हजारो बचत गट निर्माण झाले असून त्यातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. महिला चुल आणि मुल यामधून बाहेर येवून तिला स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न सुजय विखे यांनी येथे आयोजित महिला महोत्सवाच्या निमित्ताने केला आहे. ग्रामीण भागातील महिलापण कर्तबगार आहेत. त्यांना संधी मिळण्याची गरज आहे आणि येथे ही संधी त्यांना मिळाली आहे. 

मात्र महिलांनी येथेच न थांबता आता आणखी पुढे जावे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहू असा शब्द देते आहे. विखे कूटूंब कर्जतच्या जनतेचे ऋण कधीच विसरणार नाही. डॉ. सुजय हा डॉक्‍टर आहे. यामुळे जनतेची नाडी त्याला चांगली ओळखता येते. यामुळे या तालुक्‍यातील जनतेचे सर्व प्रश्न आता सूटतील.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
डॉ.सुजय विखे म्हणाले, तीन दिवस चाललेल्या या महोत्सवास किमान 50 हजार नागरीक, महिला, युवक आणि युवती यांनी भेट दिली आहे. तालुक्‍यातील महिलांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. हा कार्यक्रम यशस्वी होवू नये म्हणून काही जणांनी छुपा विरोधही केला,मात्र येथे आलेल्या सर्व माता आणि भगिनी यांनी चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत, हे विरोध करणाऱ्यांना दाखवून दिले. 

या भागातील युवक, युवती, महिला आणि शेतकरी यांना स्वतःच्या पायावर व सक्षमपणे उभा करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले. यात काही प्रमाणात यशस्वी झालो. याचे कारण आमची समाजाशी असलेली बांधलकी आणि जनतेचा आमच्यावर पदम्‌भूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून असलेला विश्वास हेच होय. 

आता आपण यावर थांबणार नाही कुळधरण येथे आरोग्य शिबीर होणार आहे. या शिवाय बचत गटांना पारनेर मेळाव्यात संधी देणार आहे. युवक व युवतींना मराठी मालिकामधून संधी देणार आहे. पुढील दोन वर्षांनी आयोजित मेळाव्यामध्ये प्रमख पाहूना कर्जत तालुक्‍यातील कलाकार असेल, असे ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.