बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : देशात इतरत्र असलेल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे दर कोसळण्यास सुरवात झाली आहे. कांदा दारात घसरण झाल्याने कांदा दर पंधराशे रुपयाच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, ही घसरण लवकर न थांबल्यास कांदा उत्पादक अडचणीत सापडणार आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी कांद्याला सर्वाधिक 1451 रूपये बाजारभाव मिळाला आहे. एक नंबर कांद्याला 1200 ते 1451 रुपये, दोन नंबर कांद्याला 800 ते 1100, तीन नंबरला 500 ते 1000 रूपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे. संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याची एकुण 58991 गोणी एवढी विक्रमी आवक झाली होती. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गावठी कांद्याची पिक मोठ्या प्रमाणात निघाल्याने कांद्याची आवक जास्त प्रमाणात वाढली आहे. कांद्याच्या सरासरी दरामध्ये घसरण होण्यामागे कांद्याची इतरत्र व स्थानिक बाजारात वाढलेली आवकदेखील कारणीभूत असल्याचे मत कांदा तज्ञ व्यक्त करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.