स्वबळावरच निवडणुका लढविणार अन्‌ शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा सहकारी बॅंकांना हे सरकार टाळे लावायला निघाले असून दुसरीकडे बॅंका ओरबाडून ते पळून जात आहेत.पण सरकार काहीच करीत नाही.म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल,मोदी हे देशाला फसवे नेतृत्व भेटले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पारनेर येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाकरे बोलत होते. यावेळी उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, राणी लंके, उपप्रमुख रामदास भोसले, गणेश शेळके, सुरेश बोरुडे, दत्तात्रय कुलट, शिवाजी बेलकर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, निवडणुकीपुरते आम्ही शिवछत्रपतींचे नाव घेत नाही. छत्रपतींचा आशिर्वाद चला देऊ मोदींना साथ, अशी घोषणा देत ते सत्तेत आले आणि निवडणुकीनंतर छत्रपतींविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलायला लागले. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. जसा पक्ष तसा त्याचा प्रतिनिधी असतो. केंद्र सरकार लोकांचे प्रश्न सोडवायला तयार नाही. अच्छे दिन आले नाहीत. शेतकऱ्यांची वाट लावली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
जिल्हा सहकारी बॅंकांना हे सरकार टाळे लावायला निघाले आहे. ती खरी शेतकऱ्यांची बॅंक आहे. आज बॅंका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. आपण स्वबळावर पुढील निवडणुका लढणार आहोत. महाराष्ट्र मला भगवेमय झालेला पहायचाय. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे ठाकरे म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.