उपमहापौर निवडणूक - भाजपच्या निर्णयानंतर सेना रणनीती ठरविणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : उपमहापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेना-भाजपची युती असल्याने उपमहापौर भाजपच्या वाट्याला आहे. उपमहापौरपदासाठी भाजपचे दत्ता कावरे यांच्यासाठी शिवसेना आग्रही आहे. मात्र, भाजपकडून अद्याप कोणताच निर्णय न झाल्याने शिवसेना वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
उपमहापौर पदासाठी 5 मार्चला निवडणूक होत आहे. त्यासाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. मनपातील सत्तेत शिवसेना व भाजप आहेत. महापौरपद सेनेला व उपमहापौरपद भाजपला आहे. उपमहापौर पदासाठी भाजपअंतर्गत गांधी-आगरकर गटात सव्वा सव्वा वर्षांचा निर्णय झाला होता. पहिले सव्वा वर्षांसाठी छिंदम उपमहापौर झाला होता. मात्र, सव्वा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही छिंदमने उपमहापौर पद सोडले नव्हते.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्यामुळे त्याने उपमहापौर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त जागेसाठी ही निवडणूक होत आहे. शिवसेनेचा महापौर होण्यासाठी उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून कावरे यांना माघार घेतली होती. कावरे यांच्यामुळे शिवसेनेचा महापौर बिनविरोध झाला होता. त्यामुळे दत्ता कावरे उपमहापौर होण्यासाठी शिवसेना आग्रही आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
कावरे हे आगरकर गटाचे आहेत. मात्र, अजून कावरे व भाजपकडून अद्याप शिवसेनेला उपमहापौर पदासाठी कोणताच निर्णय देण्यात आलेला नाही. भाजपकडून कावरे यांच्यासह बाबासाहेब वाकळे, उषा नलावडे यांची देखील नावे चर्चेत आली आहेत. भाजपच्या निर्णयानंतरच शिवसेना पुढील रणनीती ठरविणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.