संगमनेरमध्ये विवाहितेची विषारी औषध सेवन करून आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : जमिनीच्या हिस्सा वाटपावरून सासरच्या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्या तील निंबाळे येथे आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली मनीषा अनिल दिघे वय २४ रा निंबाळे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या बाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी कि संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील संतू जोंधळे हांची मुलगी मनीषा हिचा संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथील येथील अनिल दिघे यांच्याबरोबर सन २०१2 मध्ये लग्न झाले होते त्यानंतर तिला दोन मुले आहेत.

सन 2016 ला तिचा पती अनिल चा मृत्यू झाला त्यानंतर तिचा सासरा खंडेराव अप्पाजी दिघे, सासू ठकुबाई खंडेराव दिघे,दीर अशोक खंडेराव दिघे, जाऊ अर्चना अशोक दिघे या चौघांनी संगनमत करून जमिनीच्या हिस्सा वाटपावरून तिचा सासरी शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यामुळे ती काल सोमवारी सकाळी 11 वाजता घरातून निघून गेली होती त्यानंतर तीचा त्याच दिवशी रात्री 11 वाजता तिचा मृतदेह त्यांच्याच उसाच्या शेतात आढळून आला.मनीषा हीचा मृतदेह उसाच्या शेतात सापडल्याची माहिती कौठे कमळेश्वर येथील तिच्या माहेरी समजली. 

त्यानंतर आमच्या बहीनीने सासरच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केली असल्याचा संशय तिच्या भावाने व्यक्त केला आणि तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता.
त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते त्यानंतर शहर पोलिसात तिचा भाऊ रवींद्र जोंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिच्या सासरच्या वरील चार जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.