महानगरपालिकेला महावितरणचा पुन्हा दणका.नगरकरांवर जलसंकट !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : वीज पुरवठा खंडित करत महावितरणने आज पुन्हा एकदा मनपाला दणका दिला. थकीत वीज बिलासाठी महावितरणने दुपारी 2 च्या सुमारास मुळाडॅम पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा तोडला. या कारवाईनंतर मनपा पदाधिकारी व पाणी पुरवठा अधिकार्‍यांची तातडीने बैठक झाली. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मनपाच्या पाणी योजनेचे वीजबिल थकलेले आहे. एकूण 157 कोटीच्या थकबाकी पैकी चालू वर्षाचे 13 कोटीची थकबाकी आहे. या थकबाकीसाठी महावितरणने आज मुळा डॅम पंपिंग स्टेशनची वीज खंडित केली. महावितरणने वीज तोडल्याने मनपाच्या पाणी पुरवठा विभागाची चांगलीच धावपळ उडाली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यामुळे मनपा दुपारी पदाधिकारी व अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेण्यात आली. मुळाडॅम पंपिंग स्टेशनची वीज तोडल्याने नगरशहर व उपनगरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. दरम्यान मागील आठवड्यात महावितरणने वीज खंडित करण्याचा मनपाला इशारा दिला होता. त्यावेळी मनपाने 1 कोटीचा धनादेश महावितरणला दिला होता. तसेच पुढील तारखेचाही 1 कोटीचा धनादेश सुपूर्द केला होता. त्यामुळे वीज खंडितचे संकट तात्पुरते टळले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.