नगरकरांसाठी खुशखबर ! नगर-पुणे रस्त्याचे भाग्य उजळणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : नगर-पुणे हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गाकडेे हस्तांतरित होणार असल्याने या रस्त्याचे लवकरच भाग्य उजळणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी तब्बल 1200 कोटी रूपयांचा डिटेल प्रोजक्ट रिपोर्ट (डीपीआर) बनविण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नगरकरांचा पुणे प्रवास अधिक सुकर होईल. लवकरच या महामार्गासाठी लागणारा निधी सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर होणार आहे. यामुळे महामार्गाला नवसंजीवनी मिळणार असल्याने नगरकरांसाठी ही खुशखबर आहे !

नगर ते पुणे असा दैनंदिन प्रवास करणारे नगरमधील हजारो प्रवासी आहेत. नगर-पुणे हे 110 किमी अंतर अवघे अडीच तासांचे. परंतु वाहतूक कोंडीमुळे या प्रवासासाठी तब्बल पाच तास लागतात. कोरेगाव, शिक्रापूर ते वाघोलीपर्यंतच्या वाहतूक कोंडीत तब्बल दोन तास जातात. या महामार्गावरील शिरूर ते पुणे अशी 70 किमीची वाहतूक कोंडी नित्याची बनली असून अपघातांची संख्या हा चितेंचा विषय बनला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
रांजणगाव गणपती-वाघोली या 35 किमी अंतरादरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती आहे. या महार्गावर रस्ता रूंदीकरण व तीन उड्डाणपुलांसाठी 1 हजार 200 कोटी रूपयांचा डीपीआर बनविण्यात आला आहे. शिरूर-पुणे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 70 किमी रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. 

वाघोलीतील उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यानंतर कोरेगाव भीमा आणि शिक्रापूर या दोन उड्डाणपुलांच्या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. कारेगाव, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पेरणे फाटा, लोणी कंद आणि वाघोली या ठिकाणी अतिक्रमणांचा विषय प्रामुख्याने ऐरणीवर आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.