पारनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेत राडा, लंके - औटी समर्थकांतील गटबाजी चव्हाट्यावर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : पारनेर तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर दोन गटांमधील वादाने हिंसक वळण घेतले. आमदार विजय औटी यांच्या गाडीवर झाली आहे. ठाकरे यांची वाहने पुढे गेल्यानंतर मागे असलेल्या गाडीवर दगडफेक झाली. यात कोणीही जखमी झालेले नाही, असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगरमधील पारनेर येथे शिवसेनेची सभा होती. या सभेत शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली. दोन गटांमध्ये आधी वाद झाला आणि त्यानंतर झालेल्या गोंधळात शिवसेना आमदार विजय औटी यांच्या कारचा धक्का लागल्याने शिवसेनेचे दोन स्थानिक नेते किरकोळ जखमी झाले आणि वाद चिघळला. संतप्त शिवसैनिकांनी तेथील कारवर दगडफेक केली. 

उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर हा राडा झाल्याने पक्षाची नाचक्की झाली. आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावर निलेश लंके गटाने बहिष्कार टाकला. मात्र, कार्यक्रम सुरु होताच लंके गटाने सभास्थळी गर्दी करुन शक्तीप्रदर्शन केले. लंके समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी केली. सभा संपल्यावर उद्धव ठाकरेंपाठोपाठ औटी देखील निघाले. औटी यांच्या कारचा धक्का लागल्याने लंके गटातील दोन जण किरकोळ जखमी झाले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
निलेश लंके हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम करीत असताना त्यांनी तालुक्यात सेना मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. पण सध्या आमदार विजय औटी आणि लंके यांचे बिनसले आहे. कार्यक्रमास नीलेश लंके उपस्थित नव्हते. त्यामुळेच लंके यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली. नीलेश लंके यांची पत्नी राणी लंके या जिल्हा परिषद निवडणूकीत सेनेकडून निवडून आलेल्या आहेत. नीलेश लंके हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचा तयारीत आहेत. शेतकरी मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे अहमदनगरला गेले आहेत.आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.