विधानसभेसाठी आमदार औटी यांना नीलेश लंके यांचेच आव्हान !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार विजय औटी यांना शिवसेनेचे तालुका प्रमुख नीलेश लंके यांचेच मोठे आव्हान राहणार आहे. त्यादृष्टीने लंके यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू आहे. आमदार औटी यांच्या एकहाती हुकूमशाहीला कंटाळून तालुकाप्रमुख लंकेंच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडाचे निशाण फडकवले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आमदार औटी व त्यांचे पुत्र उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांच्याकडून लंके यांना दुजाभावाची वागणूक मिळत आहे. त्यामुळे आमदार औटी व तालुकाप्रमुख लंके यांच्यातील राजकीय दरी वाढत आहे. ही दरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या बैठकांमध्ये दिसून आली.

आमदार विजय औटी यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवारी (२७ फेब्रुवारी) पारनेर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमावर बहिष्कार घालणार असल्याने आमदार औटी समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
 
लंकेंच्या पाठीमागे 'मातोश्री' वरील महत्त्वाचा एक गट उभा आहे. त्यांनीही विधानसभेचे तिकीट मिळवून देण्याचा शब्द लंकेंना दिला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे सध्यातरी कुरघोडीच्या राजकारणाला पारनेरच्या शिवसेनेत उत आला आहे.
 
तालुक्यात कोणतीही निवडणूक नसताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा दौरा व शेतकरी मेळाव्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, असा सवाल शिवसैनिकांसह सर्वसामान्यांंमध्ये निर्माण झाला आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकींत तालुकाप्रमुख लंकेंनी आमदार औटी यांची प्रचाराची धुरा सांभाळून आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात घातली आहे.
 
प्रत्येक गावागावात तालुकाप्रमुख लंके यांचे तरुणांचे असणारे नेटवर्क यामुळे ते तरुणांसह सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे तालुकाप्रमुख लंकेंची विधानसभेच्या तयारीने याचा मोठा फटका आमदार औटी यांना बसणार असल्याने वरिष्ठ पातळीवर लंकेंचे ब॔ंड थंड करण्यासाठी व शिवसेना पक्षामध्ये आपले वजन दाखवण्यासाठी या शेतकरी मेळाव्याला किनार असल्याची चर्चा आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तर दुसरीकडे शिवसेनेतील आमदार औटी व नीलेश लंके यांच्यातील बंडाळी फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेससह अपक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला राष्ट्रवादी व काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेत बंडाळी झाली तर नवल वाटू नये.
आमदार औटींची राजीनाम्याची धमकी? 
शिवसेनेसह आमदार औटी शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहेत, तर तालुकाप्रमुख लंकेनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद निवडणूक असो वा जिल्हा नियोजन मंडळात एक हाती वर्चस्व यामुळे लंकेची तालुक्यात ताकद वाढली आहे. पक्षाने जर लंकेना ताकद दिली, तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, अशी धमकी औटी यांनी शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना दिली असल्याची माहिती समजली. 

लंकेंना भाजप व दोन्ही काँग्रेसची ऑफर 
शिवसेना तालुकाप्रमुख लंकेंची जोरदार तयारी चालू केली आहे. त्यातच राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेससह 'प्रवरे'च्या यंत्रणेने नीलेश लंकेशी संपर्क करून विधानसभेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील सर्वात जास्त लोकप्रियता लंकेंना मिळाली आहे. त्याची दखल भाजपच्या बंगलोर येथील मीडिया सेंटरनी घेतली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.