भानुदास कोतकरला वैद्यकिय उपचारासाठी जामिन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप झालेला भानुदास कोतकर याला मुंबई हायकोर्टाने आज, सोमवारी (दि 26) जामिन मंजूर केला आहे. मात्र, हा जामिन देताना न्यायालयाने कोतकरला नगरमध्ये जाण्यास तसेच परदेशात जाण्यास मज्जाव केला आहे. वैद्यकिय उपचारासाठी हा जामिन मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगरच्या अशोक लांडे खून प्रकरणात भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप याच्यासह सचिन व अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्निल पवार व वैभव अडसूळ यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. तर भाजपचे आ. शिवाजी कर्डिले यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.

शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक भीमराज लांडे याचा 19 मे 2008 रोजी केडगावमध्ये मारहाण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी घटनेतील साक्षीदार शंकरराव राऊत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2013 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

उच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार हा खटला पुढे नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आला. या प्रकरणात भाजपचे आ. शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, नगरचे माजी महापौर संदीप कोतकर, सचिन व अमोल कोतकर यांच्यासह एकूण 15 जणांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले. नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन सहा जणांना दोषी ठरवण्यात आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
न्यायालयाने भानुदास कोतकर व त्याच्या तीन मुलांना जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तर भानुदास कोतकरला तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांचा दंड तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्वप्निल पवार आणि वैभव अडसूळ यांना दोषी धरत दोन वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. उर्वरित नऊ संशयितांची पुराव्यांअभावी मुक्तता करण्यात आली. त्यात भाजप आ. कर्डिले यांचा समावेश आहे. कर्डिले यांच्यावर मयताच्या कुटुंबीयांना आर्थिक देवाणघेवाणीचे आमिष दाखविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.