जिल्ह्यातील 334 चारा छावणीचालक संस्थांवर गुन्हे दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : चारा छावणी गैरव्यवहारप्रकरणी जिल्हा प्रशासनाने 334 चारा छावण्यांच्या चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी जिल्ह्यात 2012-13-14 मध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या चारा छावणीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील गोरख आनंदा घाडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल जनहित याचिका दाखल केली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या संयुक्त न्यायपीठासमोर 23 फेब्रुवारीपर्यंत तब्बल 13 वेळेस सुनावणी झाली आहे. पुढील सुनावणी 1 मार्च रोजी होणार असून, उर्वरित संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे काम तालुका दंडाधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे.
जिल्ह्यामध्ये 2012 ते 2014 अशी सलग दोन वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे 426 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या; यापैकी काही चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळली होती. जनावरांची संख्या, चारा उपलब्धता व अन्य विविध मुद्यांच्या अनुषंगाने अनियमितता आढळलेल्या चारा छावण्यांना दंडसुद्धा करण्यात आला होता. 

जिल्ह्यामध्ये अशा एकूण 426 छावण्या असल्या तरी त्यापैकी काही छावणीचालकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. फेब्रुवारीच्या प्रथम सप्ताहात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंडळाधिकाऱ्यांमार्फत छावणी चालकांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्याची सुरुवात झाली. 23 फेब्रुवारीपर्यंत 7 तालुक्‍यांमध्ये 334 चारा छावणी चालविणाऱ्या संस्थांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने गुन्हे नोंदवले आहेत. सर्वात जास्त 130 गुन्हे हे कर्जत तालुक्‍यामध्ये नोंदवले गेले आहे. उर्वरित चारा छावणी चालविणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे काम तालुका दंडाधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तालुकानिहाय दाखल करण्यात आलेले गुन्हे
नगर-59, पारनेर-36, पाथर्डी-14, कर्जत-130, श्रीगोंदा-81, जामखेड-5, नेवासा-9,
अशा एकूण 334 चारा छावण्या संस्थांवर गुन्हे दाखल केले असून, उर्वरित गुन्हे दाखल करण्याचे काम तालुका दंडाधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे.

सहा महिन्यांपर्यत कारावास किंवा दंड
चारा छावणी गैरव्यवहारप्रकरणी चारा छावण्यांच्या चालकांविरुद्ध कलम 188 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कलमानुसार सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. चारा छावणी घोटाळाप्रकरणी सुरू असलेल्या या कारवाईमुळे अनेकांची झोप उडाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.