वाळुने भरलेला ट्रक तहसील कार्यालयातून पळवला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तहसील कार्यालयातुन वाळुने भरलेला ट्रक लंपास झाल्याची घटना घडली आहे.या घटनेची अधिक माहिती अशी, 7 लाख रूपये किंमतीचा लाल रंगाचा एम.एच.16 ए.एस.5999 क्रमाकाचा 4 ब्रास वाळुने भरलेला तहसील कार्यालयाच्या पाठीमागच्या आवारात लावलेला असतांना तहसील कार्यालयाच्या ताब्यात असतांना आरोपी सागर किसन कोल्हे(रा.अ.नगर) याने दुपारी 12.10 वाजण्याच्या सुमारास लंपास केल्याप्रकरणी फिर्यादी श्रीनिवास रंगनाथ आव्हाड (रा.बालीकाश्रम रोड ,अ.नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसील कार्यालयातून वाळुने भरलेला ट्रक लंपास झाल्याने नागरिकांमधुन तहसील कार्यालया विषयी वेगवेगळया चर्चा होत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.