प्राजक्त तनपुरेंकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्‍याच्या पश्‍चिमेला विशेषतः जिराईत भागाची जलसंजीवनी म्हणून समजल्या जाणाऱ्या व सध्या वीजबिल थकबाकीत असल्याने बंद असलेल्या भागडा पाइप चारीला प्रसाद शुगरमार्फत तब्बल आठ लाख सत्तर हजारांची रक्कम परतफेडीवर देऊन ही बंद असलेली पाइप चारी सुरू केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचे अभिनंदन केले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
रडतखडत चालणारी ही चारी बिलाअभावी बंद होती. यासंदर्भात लाभार्थी शेतकरी विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. परंतु, त्यांनी पैसे भरल्याशिवाय ही योजना चालू होणार नसल्याचे स्पष्ट सांगितल्याचे शेतकऱ्यांनी प्राजक्त तनपुरे यांना सांगून आपण पर्याय काढण्याचे साकडे घातले; त्यांनी तत्काळ ही रक्कम उपलब्ध करून कणगर येथे जाऊन कणगर, गणेगाव, चिंचविहिरे येथील शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून प्रसाद शुगरमार्फत योजना सुरू करून दिली असून पाणी सुरू करण्यात आले आहे. उपलब्ध करून दिलेली रक्कम दोन आवर्तनात परत करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या निर्णयाबद्दल तनपुरे यांचे परिसरातील शेतकऱ्यांमधून कौतुक होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.