तोतया डॉक्‍टरला तीन वर्ष सक्‍तमजुरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वैद्यकीय परिषदेची कोणतीही पदवी नसताना शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विश्‍वजितकुमार विश्‍वास (वय 30) या तोतया डॉक्‍टरला तीन वर्ष सक्‍तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायाधीश पी. एन. ढाणे यांनी ठोठावली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
माळीवाडा भागातील ब्राह्मणगल्ली येथे सरस्वती क्‍लिनिक या नावाने विश्‍वजितकुमार विश्‍वास (मूळ रा. मनोहरपूर, ता.जि. नंदिया, पश्‍चिम बंगाल, हल्ली रा. सारसनगर, नगर) हा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या माहितीवरून मनपा आरोग्याधिकारी डॉ. नरसिंग सर्वोत्तम पैठणकर यांनी दि.30 मे 2007 रोजी दुपारी 12 वाजता सरस्वती क्‍लिनिक येथे छापा टाकला.

डॉ. विश्‍वजित विश्‍वास याच्याकडे वैद्यकीय परिषदेच्या प्रमाणपत्राची मागणी केली असता, तो कोणतेही प्रमाणपत्र सादर करू शकला नाही. महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कोतवाली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण राख यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

या खटल्यात फिर्यादी व मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. पैठणकर, तपासी अधिकारी उपनिरीक्षक राख यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. विश्‍वजित विश्‍वास हा दोषी आढळल्याने त्यास महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसाय अधिनियम अन्वये दोन वर्ष सक्‍तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दहा दिवस साधी कैद तसेच कलम अन्वये एक वर्ष सक्‍तमजुरी व 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 5 दिवसांची कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.