चार महिन्यांच्या मुलीला मारणाऱ्या खुनी बापास जन्मठेप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आपल्या चार महिन्यांच्या मुलीला जमिनीवर आपटून मारून टाकणाऱ्या बापास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील जन्मदात्याने चार महिन्याची मुलगी ईश्वरी हिला जमिनीवर आपटून मारुन टाकल्याची घटना १८ जून २०१५ रोजी घडली होती. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याप्रकरणी गुरुवारी, २२ फेब्रुवारी २०१८ रोजी संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजीव शर्मा यांनी आरोपी किसन चंदर भवारी (रा. वारंघुशी, ता. अकोले) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, किसन भवारी हा पत्नी कविता हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून दोघांमध्ये भांडणेही झाली होती. याचा राग अनावर झाल्याने किसन भवारी याने १८ जून २०१५ रोजी स्वत:च्या चार महिन्यांच्या ईश्वरी या मुलीस झोक्यातून काढून तिचे पाय धरुन जमिनीवर आपटले. तसेच पत्नी कविता हिची मावशी मिनाबाई भवारी हिस कुऱ्हाडीने मारहाण केली होती. 

याबाबत पत्नी कविता हिने दिलेल्या फिर्यादीवरुन राजूर पोलिस ठाण्यात किसन भवारी याच्या विरोधात पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली होती. या घटनेचा अधिक तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.ए.पाटील यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

या खून खटल्याची सुनावणी संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजीव शर्मा यांच्यासमोर झाली. या वेळी सरकारी वकिल संजय वाकचौरे यांनी सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. या खटल्यातील सबळ पुरावे सादर केल्यामुळे न्यायाधीश संजीव शर्मा यांनी आरोपी किसन भवारी यांस जन्मठेप व २५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली. 

दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीचीही शिक्षा सुनावली आहे. तसेच आयपीसी कलम ३२४ या कलमाखाली १० हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यावेळी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार पी. एच. खोसे, शकील इनामदार, सिकंदर शेख यांनी मदत केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.