श्रीपाद छिंदमला कोण कोण पाठीशी घालीत आहे ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : अहमदनगर महानगरपालिकेचा पदच्युत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्याला दूरध्वनीवरून शिवजयंती आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याची ध्वनी फीत मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद संबध महाराष्ट्रात उमटले. सर्व पक्ष व शिवप्रेमी संघटनांनी छिंदमचा निषेध केला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिवप्रेमींच्या रेट्यामुळे छिंदमला मिडीयावर चित्रफितीद्वारे माफी मागावी लागली.लोकक्षोभ शांत करण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यांची पक्षातून हकालपट्टी करून अटक देखील करावी लागली. या सर्व घडामोडीमध्ये श्रीपाद छिंदमला कोण कोण पाठीशी घालीत आहे ? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. तुकाराम दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

प्रा. दरेकर म्हणाले, श्रीपाद छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा तातडीने महापौरांकडे मंजुरीला गेला नाही. त्यांच्यावर भा. दंड विधान कलम २९५ अ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदरचे कलम दखलपात्र, अजामीनपात्र आणि नॉन कंम्पाऊन्डेबल असताना छिंदमला पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी न करता न्यायालयीन कोठडी का मागितली ? पोलीसांच्यावर नेमके कोणाचे दडपण होते ? याचाही शोध लागला पाहिजे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १३ (१) (अ) प्रमाणे पालिका सदस्य म्हणून कर्तव्य बजावत असतांना , कोणत्याही गैरवर्तणुकीबद्दल किंवा कोणत्याही अशोभनीय वर्तणुकीबद्दल दोषी ठरला असेल तर, राज्य शासनास स्वत:हून किंवा महानगरपालिकेच्या शिफारशीवरून त्या सदस्यास पदावरून दूर करता येते. त्यासाठी संबधित महानगरपालिकेत तीन-चतुर्थांश पालिका सदस्यांनी मंजूर केलेला ठराव राज्य शासनाकडे पाठविला पाहिजे. म्हणजे ६८ सदस्यांच्या अहमदनगर महापालिकेत ५१ सदस्यांनी श्रीपाद छिंदम यांना सदस्य पदावरून दूर करण्याचा ठराव करावा लागेल. 

यामध्ये कोण कोण सदस्य छिंदमला पाठीशी घालण्यासाठी ठरावाला विरोध करतात ? हे देखील लोकांना समजले पाहिजे. छिंदम यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचे म्हणणे घ्यावे लागेल व एक महिन्याच्या कालावधीनंतर त्यांना सदस्य पदावरून दूर करण्याचा निर्णय राज्य शासनाला घेता येईल. छिंदम यांचा उपमहापौर पदाच्या राजीनामयातील मजकूर आणि सोशिअल मिडीयावर व्हायरल झालेली छिंदम यांची माफी मागणारी चित्रफित हा मोठा पुरावा होऊ शकतो.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अख्तर शेख ( श्रीगोंदा ) यांनी दिनांक २० फेब्रुवारी २०१८ रोजी छिंदम यांचे महापालिकेचे सदस्यत्व निरर्ह ठरविण्यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अपील दाखल केलेले आहे. व त्याची एक प्रत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री. धनंजय मुंडे यांना दिलेली आहे. राज्याचे व संबंध देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत खरोखरच आस्था आहे कि छिंदमवर आस्था आहे , याची परीक्षा या निमित्ताने भाजपची, भाजपच्या नेत्यांची आणि भाजप शासनाची होणार आहे कोणाची काय भूमिका आहे ? हे लोकांच्यासमोर येणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.