संगमनेर जिल्हा मुख्यालय मागणीसाठी सह्यांची मोहीम

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर जिल्ह्याचे विभाजन करताना सर्व दृष्टीकोनातून योग्य असलेल्या संगमनेर हेच नव्या जिल्ह्याचे मुख्यालय करावे, या मागणीसाठी संगमनेर जिल्हा कृती समितीच्या वतीने आजपासून सह्यांची मोहीम सुरू केली आहे. बसस्थानकासमोर नागरिकांची सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. याद्वारे शासनाच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगर जिल्ह्याच्या विभाजनाबाबत भौगोलिकदृष्ट्‌या व लोकांच्या सोयीच्या दृष्टीने संगमनेर, श्रीरामपूर की शिर्डी मुख्यालयाच्या वेगवेगळ्या चर्चा होवू लागल्या आहेत. त्यात संगमनेर तालुक्‍याचे क्षेत्रफळ 1 लाख 68 हजार हेक्‍टर आहे. हे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्‍यापेक्षा सर्वाधिक मोठा तालुका हा आहे. संगमनेर शहर हे पुणे-नाशिक महामार्गावर असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे आहे. 

अलिकडच्या काळात नव्याने सर्वेक्षण होवून नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा संगमनेर परिसरातून जात आहे. त्या साठी अर्थसंकल्पनात तरतूद करण्यात आली आहे या बरोबरीने शिर्डी विमानतळही संगमनेरपासून अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. याच बरोबरीन कार्यालयासाठी जमीनही आहे. त्यामुळे संगमनेर हेच नव्या जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे ही मागणी होत आहे. जिल्हा कृती समिती स्थापन करून पुन्हा एकदा संगमनेरकर रस्त्यावर उतरले आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

संगमनरे जिल्हा झालाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी कृती समितीचे अमोल खताल, अमर कतारी, अमोल कवडे, प्रशांत वामन, शरद थोरात, अशोक सातपुते, ज्ञानेश्‍वर कांडाळकर, अमित चव्हाण, विवेक भिडे, पप्पू कानकाटे, राजाभाऊ देशमुख, किरण घोटेकर, सीताराम मोहरीकर, दीपक भगत, राजेंद्र सांगळे, रमेश काळे आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.