सावेडीत वकीलाच्या घरात घुसून मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर शहरातील तोफखाना हद्दीतील सावेडी भागात राहणाऱ्या वकीलाला घरात घुसून मारहाण करण्याची घटना घडल्यामुळे ,परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या घटनेची अधिक माहिती अशी, फिर्यादी अनिल सुभाष माने हे वकील असून ते त्यांचे कामकाज उरकून त्यांच्या घरी सावेडी येथील मातोश्री अपार्टमेंट येथे आले असतांना आरोपी वसंत शंकर शिंदे हे घरी येवून फिर्यादीस तु हे घर खाली कर असे म्हणत असतांना फिर्यादी आरोपींना समजुन सांगण्याचा प्रयत्न करीत असतांना आरोपी वसंत शिंदे याने फोनवरून श्रीकांत वसंत शिंदे, संतोष वसंत शिंदे, काकासाहेब वसंत शिंदे, राजु शंकर शिंदे, व त्याची भावजयी आशाबाई(सर्व रा. पवननगर,सावेडी, अ.नगर) यांना बोलवून तु घर खाली कर असे म्हणत मारहाण करून शिवीगाळ केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसेच घरातील कपाटाची उचकापाचक करुन तोडफोड केली. व सोनी कंपनीचे होम थिऐटर ,फ्रिज लंपास करून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोंपीविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.