अलेक्स् फर्नांडेझ करंडक फुटबॉल स्पर्धा - शिवाजीयन्स् एफसी संघाला विजेतेपद

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवाजीयन्स् एस.सी. यांच्यावतीने आयोजित चौथ्या कै. अ‍ॅलेक्स् फर्नांडेझ करंडक 2018 स्पर्धेत अहमदनगरच्या शिवाजीयन्स् एफसी संघानेलॉरेन्स् एफसी संघाचा 2-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. फोर्ट (किला) मैदान, अहमदनगर क्लब लिमिटेड जवळ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत शिवाजीयन्स्ने पिछाडीवरून जबरदस्त खेळ करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सामन्यात लॉरेन्स् एफसीच्या मनीष वादगळे याने सहाव्या मिनिटालाच गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शिवाजीयन्स् एससीच्या गौरव चावरे याने 23 व्या मिनिटाला गोल करून सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. पुर्वार्धात ही बरोबरी कायम होती. उत्तरार्धात आकाश गायकवाड याने 38 व्या मिनिटाला निर्णायक गोल करून शिवाजीयन्स् संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण शांतीकुमारजी फिरोदीया मेमोरीयल फाऊंडेशनचे मुख्य विश्‍वस्त नरेंद्र फिरोदीया यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे स्व. अ‍ॅलेक्स् फर्नांडिस यांचे चिरंजीव रोनप फर्नांडिस, त्यांची कन्या अनिता परेरा व जावई नितीन परेरा हे होते. यावेळी शिवाजीयन्स्चे अध्यक्ष मनोज वाळवेकर, अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे खजिनदार राणा रशपाल, सचिव गॉडविन डिक, सदस्य जोगासिंग मिनास, पल्लवी साईदाणे, व्हिक्टर जोसेफ, झेवियर स्वामी, उपेंद्र गोलांडे, सचिन पत्रे, राजेश अ‍ॅन्थोनी व रामाकृष्णा कनोजिया आदि उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

यावेळी विजेत्या आणि उपविजेत्या पारितोषिकांसह इतरही वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. सर्वोत्कृष्ट गोलरक्षक रोहीत कुसाळकर (शिवाजीयन्स्), सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक अतुल नाईकवाल (शिवाजीयन्स्), सर्वोत्कृष्ट स्ट्राईकर शुभम काळे व मालिकावीर अनुप भगत (शिवाजीयन्स्) अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम फेरीः शिवाजीयन्स् एससी, नगरः 2 (गौरव चावरे 23 मि., आकाश गायकवाड 38 मि.) वि.वि. लॉरेन्स् एफसीः 1 (मनीष वादगळे 6 मि.); हाफ टाईमः 1-1.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.