डॉ.अमोल बागूल एड्स जनजागृतीचे राज्य 'व्हॉट्सअपदूत,

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सुमारे १५०० पेक्ष्या जास्त व्हाट्सअप ग्रुपमधील सहभागाची दखल घेवून नगर येथील गिनीज,नासा,आएसओ तसेच राष्ट्रपती पदक,सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ. अमोल सुभाष बागूल यांची राष्ट्रीय एड्स नियंत्रण उपक्रमांतर्गत राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतंर्गत व जिल्हा रुग्णालय,अहमदनगर मार्फत जिल्हा एड्स व प्रतिबंधक विभागाच्या वतीने HIV एड्स राज्य 'व्हॉट्सअपदूत म्हणून नुक्तीच नियुक्ती करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
डॉ.बागूल यांचा जगातील विविध भाषांतील व्हॉट्सअप ग्रुप व सोशल मिडिया चळवळीत सहभाग आहे.सोशल मिडियातून मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होते आहे.समाजातील सर्वच वयोगट विशेषतः तरुणवर्गास HIV बद्दल जागरूक करण्याच्या हेतूने शासनाच्या वतीने ही योजना राबविली जाते.या ग्रुपमधून मराठी ,हिंदी,इंग्रजी भाषांसाह इतर भाषांसाठी अनुवादक अँपच्या माध्यमातून दुर्धर रोग HIV एड्स विषयक प्रबोधन करून एड्स विषयक चित्रमय संदेश,माहिती,कारणे,उपाययोजना,औषधोपचार, खबरदारी,दक्षता सांगणारे संदेश,चित्रे,छायाचित्रे,व्हिडिओ क्लिप्स आदी साहित्य डॉ.बागूल यांच्या सहभागी व्हॉट्सअप ग्रुपमधून पाठवले जाणार आहे.

याकामी डॉ.बागूल यांचा ९५९५ ५४ ५५५५ हा व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक असून इतर ग्रुपचे अँडमिन देखील बागूल यांना जनजागृती हेतूने त्यांच्या ग्रुपमध्ये अँड करू शकता.या ग्रुप्सच्या माध्यमातून HIV एड्स विषयक प्रबोधनपर चित्रमय संदेश,घोषवाक्ये,निबंध,व्हिडिओ क्लिप,वक्तृत्व,पथनाट्ये प्रकारातील "ऑनलाइन स्पर्धा" घेण्याचा डॉ.बागूल यांचा मानस आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

डॉ.बागूल यांची व्हॉट्सअप,फेसबुक,ट्विटर सह सुमारे १०० सोशल मिडियातील संपर्क-अँप ची खाती आहेत. यामध्ये मेसेंजर, इन्स्टाग्राम,लिंकडेन,टेलिग्राम,टेलिग्राफ,स्काइप, मीट-मी,पिंटरेस्ट, युट्युब, टंबलर,डेली मोशन, हिट-वे,जी मेल,याहू,आउट लूक,हिप चॅट, स्नॅप चॅट,रेड इट,टॅगड्,ए.ओ.एल.,स्कॉऊट,मिट-अप,जोऊमो, मिग-मी,टॉप फेस,ग्रेप, सायरॉल्ड, माय स्पेस, क्लासमेट,व्हाईन,मायको,साऊंड क्लॉउड, इमगर, ब्याडडो, फ्लिक्स्टर आदिंचा समावेश असून या सोशल अकाउंटस च्या मदतीने डॉ.बागूल HIV एड्स विषयक प्रबोधन करणार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.