अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भावाचा भावानेच काढला काटा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील धरमाडी टेकडीच्या पायथ्याशी झालेल्या विटभट्टी कामगाराच्या खुनाचे रहस्य उलगडले असून याप्रकरणी त्याच्या सख्ख्या भावाला अटक करण्यात आली आहे. हा खून अनैतिक संबंधाला अडथळा केल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याप्रकरणी श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले, की दि. २२ ऑक्टोबर २०१७ रोजी राहुरी तालुक्यातील धरमाडी टेकडीच्या पायथ्याशी चेहरा दगडाने ठेचलेल्या व नग्नावस्थेत असलेला एका ३० वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान तो पिंप्री अवघड येथील विटभट्टीवरील कामगार किरण रावसाहेब शेलार याचा असल्याचे निष्पन्न झाले होते.

 जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना तपासाचे आदेश दिले होते. त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन सर्व प्रकार समजावून घेतला होता. अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचनांप्रमाणे राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव, कॉन्स्टेबल फुरकान शेख, सचिन धनाड, चालक दातीर, राहुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस नाईक बंडू बहीर, गुलाब मोरे, कॉन्स्टेबल नवनाथ वाघमोडे, भिसे यांच्या पथकाने अधिकारी पवार यांनी निर्देशित केल्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. 

यात मयताचा सख्खा भाऊ अमोल रावसाहेब शेलार (वय २८, रा. तेलगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे) या संशयितास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. यावेळी अनैतिक संबंधात अडथळा होत असल्यामुळे व वारंवार मारहाण करीत असल्यामुळे भावाचा खून केल्याचे त्याने सांगितले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

अधिक माहिती देताना त्याने सांगितले, की दि. २१ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी पाच वाजता आरोपी स्वत: व मयत किरण शेलार हे आईवडिलांकडे बाभळेश्वर येथे आले होते. तेथून ते एकत्र शनिशिंगणापूर फाटा येथे आले. त्याठिकाणी आरोपीने त्याचा साथीदार सोबत घेतला व त्या दोघांनी मिळून खून केला आणि मयताच्या कपड्यांची विल्हेवाट लावली.

याप्रकरणी आरोपीस राहुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. ४०७/२०१७ भा.दं.वि.क. ३०२, २०१ प्रमाणे अटक करण्यात येऊन त्यास राहुरी पालिसांच्या ताब्यात देण्यात आले. फारार असलेल्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.