महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी ही तीन नावे चर्चेत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेच्या उपमहापौर पदाचे कवित्व आता सुरू झाले आहे. ही निवडणूक पाच मार्च रोजी होणार आहे. श्रीपाद छिंदम यांचा उपमहापौर पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदाच्या स्पर्थेत शिवसेनेतूनही काही जण इच्छुक आहेत. एकूणच या पदासाठी रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहेत.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
दत्ता कावरे, बाबासाहेब वाकळे, उषा नलवडे ही चर्चेतील नावे आहेत. कावरे यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या महापौर निवडीची वाट बिनविरोध झाली होती. त्यामुळे शिवसेना कावरेंच्या उपमहापौर पदासाठी इच्छुक आहे. तर उपमहापौर पदाची संधी उपनगराला देण्याची चर्चा भाजप व शिवसेना दोन्ही बाजूंनी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस थांबा व पहाच्या भूमिकेतून आपल्या निर्णयाची पाने राखून आहे. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट होऊ शकते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.