नगर औरंगाबाद रस्त्यावर अपघातात एक ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर औरंगाबाद रस्त्यावरील शेंडी बायपास रस्त्यावर अपघाताची घटना घडली असून या अपघातात एक ठार झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबतची माहिती अशी, फिर्यादी वैभव रमेश गवळी(रा.जयमल्हार नगर,नवनागापूर,ता.जि.अ.नगर) यांचे आजोबा कुंडलीक एकनाथ गवळी हे शेंडी बायपास रस्त्याने सायंकाळी 8 वाजता नामदेव गव्हाणे यांच्या घरासमोरून फिरत असतांना त्यांना अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगाने जोराची धडक दिल्याने त्यांचा मृत्यु झाला. घटनास्थळावरून अज्ञात वाहन चालक पसार झाला असून या प्रकरणी आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.