कुकडीचे आवर्तन दोन दिवसांत - माजी मंत्री पाचपुते.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कुकडीच्या आवर्तनाची सुरुवात दोन दिवसात होणार असून, आपण मागील आठवड्यात जलसंपदा मंत्री व पालकमंत्री यांना भेटून घोड व कुकडीचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेत आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली असून, बदलत्या हवामानामुळे पाणी पातळीत घट होत चालली असल्यामुळे कुकडीचे आवर्तन तातडीने सोडणे गरजेचे होते. म्हणून मागील आठवड्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांना भेटून घोड व कुकडी, विसापूरचे आवर्तन तातडीने सोडावे अशी मागणी केली होती. त्यानुसार घोडचे आवर्तन सुरु झाले आहे. त्याचबरोबर कुकडीचे आवर्तन दोन दिवसात सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर विसापूरचे आवर्तनही लवकरच सुटणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.