श्रीगोंद्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेस बेदम मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तू माझ्या पतीच्या गाडीवर तोंड बांधून का जातेस, असे विचारत एका महिलेला शिवजयंतीच्या दिवशीच बेदम मारहाण झाली. अत्याचारित महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद देऊनही राजकीय हस्तक्षेपामुळे सहा दिवस उलटूनही आरोपींवर कारवाई झालेली नाही. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आरोपींना तातडीने अटक करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आदर्श ग्रामसेवक पुरस्कारप्राप्त ग्रामसेवकाचे एका संघटनेत काम करणाऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन संबंधित ग्रामसेवकाची पत्नी व नातेवाईकांनी या महिलेस बेदम मारहाण केली.

ती मेली असे समजून आरोपी निघून गेले. शेजाऱ्यांनी या महिलेला खासगी रूग्णालयात दाखल केले. सुदैवाने ती वाचली. शुध्दीवर आल्यानंतर उपचारांसाठी पैसे नसल्याने ती ग्रामीण रुग्णालयात गेली, पण डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतले नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शरीरावर मोठ्या जखमा असल्यामुळे ही महिला पुन्हा खासगी रूग्णालयात दाखल झाली. दुसऱ्या दिवशी ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेली. मात्र, पुढाऱ्यांच्या दबावामुळे पोलिसांनी दाद दिली नाही. फक्त अर्ज घेऊन तिला परत पाठवण्यात आले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.